Thursday, January 14, 2016

निष्पाप

                                                                     

देवा आता तू पण चालू केलास का भ्रष्टाचार?
श्रीमंत करतो स्वैराचार,गरीब होतो लाचार 

मतासाठी राजकारणी करतो प्रचार
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

भाजी नाही मजकडे म्हणून खावा लागतो आचार 
 देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

लोक म्हणतात तुझ्याकडेच असतो सारया जगाचा समाचार 
सांग रे देवा का केलास तू भ्रष्टाचार?

अन्याया विरुद्ध लढायचं म्हणून करून ठेवली तलवारीला धार 
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

नव्हत कोणी माझ म्हणून मानल होत तुलाच आधार 
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

गरीबानेच पाळायचे असतात का शिष्टाचार?
 देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

जीवाला जीव देणारा माणूस जीवालाच मुकतो
चतुर धूर्त लांडगा घराघरात घुसतो 
कर जर याचा कधीतरी विचार 
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?