Monday, January 4, 2016

बदल

                 


का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?
जगायचं कसे स्वतःच स्वतःला समजवावे लागते 

पाढे गिरवता  गिरवता अर्थव्यवहारआला सामोरे जावे लागते 
खेळताना झालेल्या शारीरिक जखमांना मानसिक जखमांनी बदलावे लागते 
का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?

भातुकलीच्या खेळातून संसाराच्या खेळाला मांडावे लागत 
अल्फा,बीटा काय लावलाय हा आटापिटा?
आयुष्याच्या गणितात हे हि गणित सोडवावे लागत 
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करावे लागत 
 का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?

आयुष्याच्या या नवीन राजनीतीत स्वतःला झोकून घ्यावे लागते 
नको असलेल्या गोष्टीनाही आपलेसे करावे लागते 
का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?