Thursday, January 14, 2016

निष्पाप

                                                                     

देवा आता तू पण चालू केलास का भ्रष्टाचार?
श्रीमंत करतो स्वैराचार,गरीब होतो लाचार 

मतासाठी राजकारणी करतो प्रचार
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

भाजी नाही मजकडे म्हणून खावा लागतो आचार 
 देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

लोक म्हणतात तुझ्याकडेच असतो सारया जगाचा समाचार 
सांग रे देवा का केलास तू भ्रष्टाचार?

अन्याया विरुद्ध लढायचं म्हणून करून ठेवली तलवारीला धार 
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

नव्हत कोणी माझ म्हणून मानल होत तुलाच आधार 
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

गरीबानेच पाळायचे असतात का शिष्टाचार?
 देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

जीवाला जीव देणारा माणूस जीवालाच मुकतो
चतुर धूर्त लांडगा घराघरात घुसतो 
कर जर याचा कधीतरी विचार 
देवा आता तू पण चालू केला का भ्रष्टाचार?

Monday, January 4, 2016

बदल

                 


का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?
जगायचं कसे स्वतःच स्वतःला समजवावे लागते 

पाढे गिरवता  गिरवता अर्थव्यवहारआला सामोरे जावे लागते 
खेळताना झालेल्या शारीरिक जखमांना मानसिक जखमांनी बदलावे लागते 
का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?

भातुकलीच्या खेळातून संसाराच्या खेळाला मांडावे लागत 
अल्फा,बीटा काय लावलाय हा आटापिटा?
आयुष्याच्या गणितात हे हि गणित सोडवावे लागत 
स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करावे लागत 
 का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?

आयुष्याच्या या नवीन राजनीतीत स्वतःला झोकून घ्यावे लागते 
नको असलेल्या गोष्टीनाही आपलेसे करावे लागते 
का आयुष्यात माणसाला मोठे व्हावे लागते?

राजकारण

       
हे असेच असतंय 
चालायचं ते चालतच असतंय 
पाळायचे ते पळतच असतंय 
ह्याकडे आपण पहायचे नसते 
ह्याच रंगात आपणही न्हाहून घ्यायचं असतंय 

Friday, November 27, 2015

इवलेसे पान

  

इवलेसे पान पडले गळून 
भावनांच्या काहोर्यात क्षण भर खचून 
त्याला जाणीवही नव्हती कि परत येणार नाही हि जागा 
कुणासाठी गमवला हा ताबा?

Monday, November 16, 2015

      
तेरा मेरा शिशेका घर 
फिर क्यू तेरे हाथ मी पत्थर? 
तुभी सौच ,मै भी सोचू ।।१।।
लेहरे आती -जाती है  किनारेपर 
फिर कयू नाम लिखा रेतपर ?
तुभी सौच ,मै भी सोचू ।।२।।
राम भी मेरा रहीम भी मेरा 
फिर क्या तेरा ,फिर क्या मेरा ?
तुभी सौच ,मै भी सोचू ।।३।।

Wednesday, May 20, 2015

गणित

 भूगोलाच्या गोलातून आर्यभटना शून्याचे वेड लाग
त्यांच्या ह्या वेडाने आमचे फार नडले 
 या गणिताचा अभ्यास करता करता 
आमचे तोंड काळवंडले 
गणित ऐच्झिक करा म्हणून 
लाखो लोक लढले
पण सरकारचेही गणितावरच अडले
जलसिंचनाच्या घोटाळ्यात अजितराव सापडले 
पावलोपावली गणित म्हणून 
राजकारणी अडखळले 
एवडे सारे अनर्थ एका गणिताने घडले.

Sunday, January 4, 2015

चारोळ्या

 आयुष्य हे एक क्रीडांगण आहे 
येथे कोणते खेळ खेळायचे हे आपल्या हातात असते 
तरीही हार  किंवा जीत कोणाची व्हायची हे  नियतीच्या हाती असते